fbpx

भाजपच्या कट्टरतेमुळे देशात दंगली घडतील, अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा

टीम महारष्ट्र देशा : भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचे वार जोरात वाहत आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालातून एक धक्कादायक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला आहे.

या अहवालात असे म्हंटले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. हा रिपोर्ट सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे.अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करत असते. ज्यात जगभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं.

याआधी देखील आशाच प्रकारची शक्यता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप हिंदू – मुस्लीम दंगल घडवून आणार आहेत. असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.