नवी दिल्ली: काल (८ डिसेंबर)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat)यांच्यासह १२ जण शहीद झाल्याची माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यूएस इंडो-पॅसिफिक कमांडने (US Indo-Pacific Command)ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर अॅडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनीही प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे.
माझे मित्र जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि त्यांच्या दुःखद निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. जनरल रावत यांच्या वारशात अमेरिका आणि भारताच्या संरक्षण भागीदारीवर आणि लोकांच्या संबंधांवर कायम प्रभाव समाविष्ट आहे. आमचे विचार आणि प्रार्थना रावत कुटुंबीय, मृत झालेल्या सर्वांचे कुटुंब आणि मित्र आणि भारतीय सशस्त्र दल यांच्यासोबत आहेत. अशी प्रतिक्रिया यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर अॅडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी दिली आहे. जनरल रावत हे यूएस इंडो-पॅसिफिक कमांड आणि युनायटेड स्टेट्स सैन्याचे उत्तम भागीदार होते. इंडो-पॅसिफिक ओलांडून शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे दिग्गज नेतृत्व आणि वचनबद्धता कायम स्मरणात ठेवले जाईल. असे ट्वीट यूएस इंडो-पॅसिफिक कमांडने केले आहे.
Gen. Rawat’s legacy includes an enduring impact on the strategic U.S. and India defense partnership and people-to-people ties. Our thoughts and prayers are with the Rawat family, the families and friends of all those who perished, and the Indian Armed Forces.” 3/3
— U.S. Indo-Pacific Command (@INDOPACOM) December 9, 2021
दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.
महत्वाच्या बातम्या:
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत