उर्वशी रौतेलाला ‘या’ कारणामुळे मागावी लागली चाहत्याची माफी

उर्वशी

युरोप : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या बोल्ड अंदाजामुळे अधिक चर्चेत असते. उर्वशीच्या या अंदाजामुळेच ती अधिक लोकप्रिय ठरली आहे. तीचा चाहता वर्ग परदेशात देखील मोठा आहे. याचाच एक किस्सा सध्या चर्चेत असून तिच्या एका चुकीमुळे तिला तिच्या चाहत्यांची माफी मागावी लागली आहे.

नुकतीच उर्वशी शुटिंगसाठी युरोपला गेली होती. मात्र तिथे गेल्यानंतर तिने तिच्या चाहत्यांना दुखावले असल्याने तिने एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. उर्वशी युरोपमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलमध्ये उर्वशीचे अनेक चाहते तिला भेटण्यासाठी आले होते. हे चाहते ७२ तास न झोपता तिथे उभे होते. परंतु, जेव्हा उर्वशी हॉटेलबाहेर आली तेव्हा तिने तिथे उपस्थित काही चाहत्यांसोबतच फोटो काढले आणि निघून गेली. उर्वशीचं असे वागणं न आवडलेल्यामुळे एका चाहत्याने व्हिडीओ करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

हा व्हिडीओ  पाहिल्यानंतर उर्वशीने त्याची माफी मागितली आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्याचा व्हिडीओ  शेअर करत तिने लिहिले की,  ‘युरोपमधील माझ्या सगळ्या चाहत्यांची मी माफी मागते. तुम्ही सगळे माझी वाट पाहत ७२ तास हॉटेल बाहेर थांबला होतात. त्यावेळी मला बरं वाटतं नसल्याने मी जास्त वेळ देऊ शकली नाही. माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. कृपया व्हिडीओमध्ये असलेल्या मुलाला टॅग करा. त्याला शोधण्यासाठी मला मदत करा. मी त्याला वैयक्तिकरित्या भेटून येईल. मला खरचं माफ करा,’ असे म्हणत तिने त्या चाहत्याला भेटण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP