Share

Rishabh Pant | ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने दिला ‘फ्लाइंग किस’! म्हणाली…

Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा विकेट-कीपर ऋषभ पंत आज आपला पंचविसावा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने देशातील त्याचा चाहता वर्ग त्याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्याचबरोबर या युवा खेळाडूला त्याचे सहकारी मित्र कुटुंबातील सदस्य शुभेच्छा देत आहे. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सुद्धा ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा नवीन इंस्टाग्राम व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच इंस्टाग्राम वर एक रील शेअर केले आहे. व्हिडिओ च्या कॅप्शनमध्ये तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ एवढेच कॅप्शन दिले आहे. या वाढदिवसाच्या शुभेच्छा कुणासाठी आहे याचा पोस्टमध्ये कुठेही उल्लेख नाही. पण नेटकऱ्यांनी या शुभेच्छा कुणासाठी असू शकतात याचा शोध लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत चर्चेत आहेत. उर्वशी ने मध्यंतरी एका पोस्टद्वारे ऋषभ पंत ला मिस्टर RP म्हणून संबोधले होते. त्यानंतर ऋषभ पंत ने एक इंस्टाग्राम स्टोरी उर्वशीला संबोधन पोस्ट केली होती. स्टोरी पोस्ट करताच त्याने ती लगेच डिलीट केले होती.

त्यानंतर उर्वशीने ऋषभच्या स्टोरीला उत्तर देत एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्या मध्ये ऋषभच्या नावाचा उल्लेख न करता तिने पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये लिहिले होते की, “छोटू भैया ने फक्त बॅट बॉल खेळायला पाहिजे. मी कुणी मुन्नी नाहीये की जी बदनाम होऊन जाईल. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा! RP छोटू भैया. कोणत्याही शांत मुलीचा फायदा घेतला नाही पाहिजे.”

यादरम्यान उर्वशी आशिया चषकाच्या भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान दिसली होती. ती टीम इंडियाला चिअर करत होती. त्यानंतर उर्वशीचे अनेक मीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा विकेट-कीपर ऋषभ पंत आज आपला पंचविसावा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने देशातील त्याचा चाहता वर्ग त्याला …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now