मुंबई : उर्मिलाचा दारूण पराभव, मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांनी नाकारले

टीम महाराष्ट्र देशा- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपचे गोपळ शेट्टी विरूद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकरांचा ४ लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला.

ऊर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात असा देखील एक तर्क होता.पण, मतदारांनी उर्मिला मातोंडकर यांना साफ नाकारलं. मतमोजणी दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे केली होती.

Loading...

दरम्यान,उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून युतीकडून शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून संजय निरुपम यांना उतरवण्यात आले होते. अखेर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने गजानन किर्तीकर यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिल्याच दिसत आहे.उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार गजानन किर्तीकर यांना ३१८१८६  एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय निरुपम यांना १७६६२३ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत गजानन किर्तीकर यांनी १४१५६३ मतांनी बाजी मारली आहे, असे म्हणता येईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...