उर्मिला मातोंडकरांना भाजप-सेनेतून ऑफर?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजप तसेच शिवसेनकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली असल्याचे समोर आले आहे. बरेच दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मातोंडकर यांच्या विरोधात भाजपचे गोपाल शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान गोपाल शेट्टी यांनी मातोंडकर यांचा दारूण पराभव करत विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना एक पत्रही पाठवले होते. दरम्यान ते पत्र सार्वजनिक झाले. खासगी पत्र सार्वजनिक झाल्याने मातोंडकर चांगल्याच भडकल्या होत्या. मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना पाठवलेल्या त्या पत्रात आपल्या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळेच आपला पराभव झाल्याचं म्हंटले आहे.

दरम्यान मातोंडकर या पक्षातील विश्वासघातामुळे पक्षावर नाराज नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मातोंडकर या दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.विशेष म्हणजे मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार मातोंडकर यांना भाजप आणि शिवेनेने पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांची मनसेही मातोंडकर यांना मनसेत आणण्याचे प्रयत्न करत आहे.

तसेच शिवसेना – भाजपच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर मातोंडकर विचार करत असल्याचेही समोर आले आहे. उर्मिला मातोंडकर या कॉंग्रेसच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन घेणेही टाळले असल्याचे बोलले जात आहे.Loading…


Loading…

Loading...