टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अशातच कॉंग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी ‘प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो! महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत! पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित’ असं ट्वीट केले आहे.
A beautiful morning becomes even better when it’s driven with the will to help people..on my way to #Sangli and #Kolhapur to be amongst the flood victims for relief work ?? #MaharashtraFloods #help pic.twitter.com/n5qcBRWvJ2
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) August 14, 2019
तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी कोल्हापूर, सांगली, कोकण, गडचिरोलीमध्ये पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. खरा तो प्रेमचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या महाराष्ट्रातील आपण मुलं आहोत. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आपण सर्वांनी पुढे सरसावायला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.
प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदती साठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो!
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत!
पूर पीडितांना कष्ट,त्रास,अपेष्टा ह्यांच्या पासून स्वतंत्र करण्यासाठी हा
स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित pic.twitter.com/40I3Ld281Q— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) August 13, 2019
दरम्यान, अभिनेता आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनीही पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. २५ लाख रुपयांचा धनादेश रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
- पूरग्रस्तांना १०-१५ हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना घेऊन घरे बांधून द्या : शरद पवार
- राष्ट्रवादी तोंडघशी, जयंत पाटलांनी दिली स्टीकर वापरल्याची कबुली
- ‘पूरग्रस्तांना घरच्या पेक्षा चांगली सुविधा उपलब्ध करून देतोय’
- पूराचं राजकारण नको, सर्वांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करा : मुख्यमंत्री