देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे आम्हाला सांगणारे तुम्ही कोण : उर्मिला मातोंडकर

टीम महाराष्ट्र देशा: नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशभक्ती किंवा धर्म काय आहे हे भाजपवाले आम्हाला सांगणारे कोण असा प्रश्न तिने विचारला आहे. भाजप सरकार आल्यापासून देशात हिंसक वातावरण तयार झाले आहे तसेच देश विकासापासून दूर गेला आहे अशा कठोर शब्दात उर्मिला मातोंडकर ने भाजपवर तोंडसुख घेतले.

धर्म म्हणजे काय ? देशभक्ती म्हणजे काय ? याविषयी तुम्ही आम्हाला सांगणारे कोण ? जी आश्वासनं दिली ती कुठे गेली ? काळा पैसा कुठे आहे ? नोकऱ्या कुठे आहेत ?हे प्रश्नही तिने उपस्थित केले आहेत. बेरोजगारी, मराठी माणूस , महिलांची सुरक्षा हे माझ्यासाठी महत्वाचे प्रश्न आहेत असही तिने सांगितलं