fbpx

राज ठाकरेंच्या पाठींब्याचा फायदा, मनसैनिकांनी देखील मदत केली – उर्मिला

टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या दृष्टीने चुकीच्या असलेल्या गोष्ठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक दाखवून दिल्या, त्यांनी पक्ष आणी निवडणुका बाजूला ठेवून अनेक मुद्दे लोकांसमोर मांडले, त्यामुळे त्यांचे बोलणे वाखाणण्याजोगे असल्याने मी त्यांची भेट घेत पाठींबा देखील मिळवला. असं कॉंग्रेसच्या लोकसभा उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हंटले आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्मिला यांनी राज ठाकरे यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठीब्याचा फायदा झाल्याचे सांगितले आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी देखील मदत केल्याचं त्या म्हणाल्या.

राज ठाकरे मांडत असलेल्या कोणत्याही मुद्यांवर निवडणुकीमध्ये इतर नेत्यांनी भाष्य केले नाही, मात्र राज यांनी सतत लोकांसाठी बोलत सरकारच्या चुका दाखवल्याचं उर्मिला मातोंडकर यावेळी म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेस प्रवेश करत उत्तर मुंबईतील मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, उर्मिला याना भाजपचे विद्यमान खा गोपाल शेट्टी यांचे तगडे आव्हान आहे.