शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाली…

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसला रामराम केल आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. आता उर्मिला मातोंडकर शिवसेनेत पक्षांतर करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या वृत्ताचे उर्मिला मातोंडकरने खंडन केले आहे.

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. त्यामुळे मीडियाला माझी विनंती आहे की, ते कोणत्याही गोष्टी ऐकल्यावर त्या शेअर करू नका. हे चुकीचे आहे, असे उर्मिला मातोंडकरने स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना केलेल्या फोनमुळे उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नार्वेकर यांनी देखील आपल्याला मातोंडकर यांचा फोन आल्याचं सांगितले आहे. मात्र यावेळी राजकीय चर्चा न होता मैत्रीतून संवाद झाल्याचं त्यांनी सांगितले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकरने तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेसकडून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारात उर्मिला यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार प्रचार केला. मात्र, उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तीचा दणदणीत  पराभव केला.