मोदींवर पिक्चर काढणे म्हणजे थट्टेचा विषय ; उर्मिला

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर भाजपावर टीका करत मोदींवरील बायोपिक म्हणजे हा थट्टेचा विषय असे म्हटले आहे. मुंबईतमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बयोपिक वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी देखील मोदींवरील बायोपिक म्हणजे हा थट्टेचा विषय अशी टीका  केली आहे. एवढेच नाही तर, भाजपाच्या योजनांवर एखादा कॉमेडी शो सुरू केला तर तोसुद्धा खूप चालेल, भाजपाच्या अनेक योजना तोंडघशी पडल्या आहेत. त्या योजनांवर एखादा कॉमेडी शो आणावा लागेल असे विधान देखील त्यांनी केले आहे.

आता मोदींचा बायोपिक रिलीज झाल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील ते पाहणे अत्यंत महत्वाचे असेल.Loading…


Loading…

Loading...