‘ऊर्मी’ संस्थेचा राज्यसाहित्य पुरस्कार उल्हास उढाण यांना जाहिर

Ulhas Udhan

औरंगाबाद प्रतिनिधी

आम्ही कवितेचं देणं लागतो,या निखिळ भूमिकेतून कवी,कलावंतांच्या सन्मानासाठी खर्ची जाणारी संस्था म्हणून ‘ऊर्मी’जालनाची ओळख  आहे.या वर्षी कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने ‘दुधात सांडले चांदणे’या कार्यक्रमाची निर्मिती ऊर्मी या संस्थेने केली असून महाराष्ट्रातील प्रतिभावंत शब्दवेड्या कलावंताची काव्य मैफल रसिक श्रोत्यांसाठी मेजवानी असेल.

दरवर्षी दिला जाणारा ‘ऊर्मी’या संस्थेचा राज्य साहित्य पुरस्कार ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय’या ग्रंथाचे लेखक प्रा उल्हास  उढाण यांना महाराष्ट्रातील धुरंधर नेतृत्व,संवेदनशील लेखक आहेत.त्यांना हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृवाच्या संशोधनपर लेखनासाठी जाहिर झाला असून रोख रक्कम पाच हजार रुपये,शाल,श्रीफळ आणि स्मृतीचिन्हान असे पुरस्काराचे स्वरूप असेल. जेष्ठ साहित्यिक  प्रा.फ.मुं.शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

दरवर्षी विविध क्षेत्रातील उलेखनिय लेखन करणा-या कलावंतांचा पुरस्कार देण्यात येतो.प्राचार्य भगवान देशमुख यांच्या उपस्थित गुरुवार दि.५ऑक्टोबर २०१७ रोजी सरस्वती भवन हायस्कुल,प्रांगण,कचेरी रोड जालना येथे सायंकाळी ७.३०वाजता संपन्न होत आहे.या उपक्रमास श्रोते-रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऊर्मी संस्था जालना परिवारा तर्फे करण्यात आले आहे.