माझ्या खात्याचा संबंध लोकांशी आहे, त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं कारण नाही’

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तो सोहळा राष्ट्रपती भावणात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष, जालण्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांची वर्णी लागली आहे.

मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. खात्याबद्दल त्यांना विचारलं असता, खात्यामध्ये कुठला फरक नसतो, त्यामुळे मला मागे गेल्यासारखं वाटत नसल्याचं दानवे यांनी सांगितलं.माझ्या खात्याचा संबंध लोकांशी आहे, त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळात अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा सहकारी म्हणून काम करायला मिळणं हा आनंद जास्त असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.