विशेष मुलाखत : उर्जित पटेलांच्या राजीनाम्याबाबत मोदिंनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या साडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदींनी मुलाखतीने केली आहे. मोदींनी ANI या आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तेव्हाच काही दिवसापूर्वी चर्चेत असलेल्या गव्हर्नर उर्जित पटेल राजीनाम्या बाबत देखील मोदिंनी खुलासा केला.

मोदी म्हणाले कि , “वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देणार असल्याचं उर्जित पटेल यांनी 6-7 महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं, पहिल्यांदाच खुलासा करतोय. गव्हर्नर म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. राजकारणाचा प्रश्नच नाही.”

रघुराम राजन यांच्या नंतर उर्जित पटेल यांनी कार्यभार कुशलतेने सांभाळला होता.त्यांनी अनेक आर्थिक धोरणे राबवली होती पण काही धोरण हि चर्चेची ठरली. एकंदरीतच उर्जित पटेल यांचा कार्यकाळ हा देशाच्या आर्थिक दृष्ट्या तसेच राजकीय दृष्टीने देखील बराच चर्चेचा विषय ठरला होता, त्यातच पटेलांनी अचानक दिलेला राजीनामा हे देखिल देशालां पडलेल कोड होत , ते आता मोदिंनी सोडवल आहे.