…अखेर उर्जित पटेल यांचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)चे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्जित पटेल यांचे मोदी सरकारशी मतभेद झाल्याची चर्चा सुरु होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिला आहे.

परंतु वैयक्तिक कारणास्तव राजीनामा आहे असे देत उर्जित पटेल सांगितलं आहे. मोदी सरकार आणि उर्जित पटेल यांच्यात सेक्शन 7 लागू करण्यावरुन वाद सुरु होता. याआधी रघुराम राजन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मोदी सरकारच्या मर्जीतील उर्जित पटेल यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) आणि मोदी सरकार यांच्यातील दरी मिटली नव्हती. त्याचा परिणाम आज उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे.