शहीदांच्या मदतीला सर्जिकल स्ट्राईक ‘उरी’, कुटुंबियांना करणार 1 कोटींची मदत

uri film director declares 1 crore to the martyrs' families

टीम महाराष्ट्र देशा: उरी चित्रपटाच्या टीमकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 1 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. उरी चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला यांनी ट्विटकरत मदतीची घोषणा केली आहे.

Loading...

जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून पुलवामा येथे सीआरपीएफ ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्यात ४० सैनिकांना वीरमरण आले आहे. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर हे शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी चित्रपटाच्या टीमकडून 1 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर बिग बी अमिताभ बच्च्चन यांनी काल शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने देखील पुढे येत सैनिकांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.Loading…


Loading…

Loading...