Mumbai: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्फी जावेद ही आपल्या वेगवेगळ्या लुक मुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेहमी तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण करत असते. उर्फी ने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक बघायला मिळतात. दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून उर्फे तिचे ड्रेस डिझाईन करत असते. सध्या उर्फीने असाच काहीतरी ड्रेस तयार केला आहे ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.
उर्फी चा नवा लुक
अभिनेत्री उर्फी नेहमी तिच्या आगळ्यावेगळ्या लुक्समुळे चर्चेत राहते. सध्या ती तिच्या नवीन लुक मुळे परत चर्चेत आली आहे. कुणी विचारही करू शकत नाही असा ड्रेस उर्फीने परिधान केला आहे. तिच्या नवीन इंस्टाग्राम रील मध्ये तिने हा लूक रिविल केला आहे. उर्फीने या व्हिडिओमध्ये चक्क घड्याळांनी मिळून बनवलेलं स्कर्ट परिधान केले आहे.
Urfi Javed | घड्याळाच्या टिक टिक आवाजासह उर्फी जावेदचा आश्चर्यचकित लुक pic.twitter.com/yBiSMV4sjd
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 4, 2022
उर्फीचा हा बोल्ड लुक
उर्फी ने तयार केलेला हा स्कर्ट तिने एका साध्या टॉप सोबत परिधान केलेला आहे. या लुक मधील उर्फीची स्कर्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण खूप सारे घड्याळ एकत्र करून उर्फीने हा स्कर्ट बनवला आहे. या लुक मध्ये उर्फी खूप बोर्ड आणि हॉट दिसत आहे.
उर्फी जरी कोणत्या सिनेमात दिसत नसली, तरी बिग बॉस नंतर उर्फीचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. इंस्टाग्राम वर उर्फीचे 3.6M फॉलोवर्स आहेत. आणि इंस्टाग्राम द्वारे उर्फी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओज आणि पोस्ट शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या
- Congress | “शेवटी मोदींचा गुण लागलाच”, काँग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली टीका
- Shivsena | दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिक संतप्त! बैठकीत वरुण सरदेसाईंना विचारला जाब, काय आहे प्रकरण?
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता 17 ऑक्टोबर पर्यंत येईल शेतकऱ्यांच्या खात्यात
- MNS | “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याआधी…” ; मनसेचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
- Farming Update | शेतकऱ्यांनी हिवाळ्यात ‘ही’ पिके घेतली तर मिळेल भरघोस उत्पन्न