महाराष्ट्र देशा डेस्क: बिग बॉस स्टार उर्फी जावेद ही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहते. नुकतेच एका मुलाखतीत उर्फीने कास्टिंग काउच प्रकरणावर भाष्य केले. सोबतच लोक तिला गरीब म्हणत तिचा कसा अपमान करायचे हेही तिने सांगितले.
उर्फी जावेदने आधीच सांगितले आहे की तिच्या आई आणि बहिणींबरोबर तिच्या वडिलांची वागणूक चांगली नव्हती. त्यामुळेच ती मुंबईला पळून गेली होती. इथे तिने खूप संघर्ष केला. उर्फीने या मुलाखतीत सांगितले की, “एक काळ असा होता की माझ्याकडे घर नव्हते. मी उद्यानात झोपायचे. हिवाळ्यात मी कोणत्याही चादरीशिवाय जमिनीवर झोपले आहे. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजते”. पुढे ती असेही म्हणाली कि, अनेकवेळा तिने जीव देण्याचा विचारही केला होता. पण प्रत्यक्षात तसे केले नाही याचा तिला आता अभिमान वाटत आहे.
उर्फीने सांगितले की “लोक म्हणायचे, तू साईड रोल करत राहशील,कारण तू गरीब आहेस”. एका प्रसंगाची आठवण करून देताना उर्फी म्हणाली, “मला आठवतं, मी एकदा एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो जिथे सगळे मोठे स्टार जायचे. तिथे एक वेटर होता ज्याने माझा अपमान केला आणि मला जायला सांगितले. तो क्षण माझ्यासाठी खूप लाजिरवाणा होता. मात्र या घटनांनी मला अधिक बळ दिले”.
उर्फी कास्टिंग काउचबद्दल बोलताना म्हणाली कि, “खरं सांगायचं तर मी टीव्ही इंडस्ट्रीत हे सर्व कधीच अनुभवले नाही. एक-दोन घटना तश्या घडल्या असतील पण म्हणून मी संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देणार नाही. मला वाटतं हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडलं असावं. कधी ना कधी कुणीतरी तिला म्हणलेच असेल की माझ्यासोबत झोपावं लागेल. पण मी नशीबवान आहे की मी या सगळ्यात अडकले नाही”.
महत्वाच्या बातम्या:
- Aaditya Thackeray : “गद्दार ते गद्दारच, त्यांच्या माथ्यावरून गद्दारीचा शिक्का…”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Yashomati Thakur : जीव गेला तरी बेहत्तर, दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर
- IND vs ZIM : विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी बीसीसीआय घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; वाचा!
- Aarey Car Shed : आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का!
- County Cricket : चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये डंका, ३ द्विशतकं झळकावून मोडला ११८ वर्षांचा विक्रम
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<