Share

Urfi Javed | बोल्ड अंदाजासह ‘उर्फी जावेद’चे नवीन गाणे रिलीज

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चाहते तिला अधिक पसंत करतात. त्यामुळे उर्फीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकसह पोस्ट शेअर करत असते. मात्र यावेळी उर्फीच्या चर्चेचे कारण तिचा फॅशन सेन्स नसून तिचे नवीन गाणे आहे. तिच्या या नवीन गाण्याने युट्युबवर खळबळ उडवून दिली आहे. या गाण्यातील उर्फीचा लुक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

उर्फीचे नवीन गाणे,”हाय हाय ये मजबुरी”

बिग बॉस OTT फेम उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी इंस्टाग्राम वर शेअर करत असते. उर्फीची चाहते बरेच दिवस झाले तिचे नवीन गाणे “हाय हाय ये मजबुरी” ची वाट बघत होते. नुसतेच हे गाणे रिलीज झाले असून, भिजलेल्या लाल रंगाच्या साडीत उर्फीचा बोल्ड लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. लुक बरोबरच उर्फीचा धमाकेदार डान्स ही या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.

“हाय हाय ये मजबुरी” हे 70 च्या दशकातील ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील हे मूळ गाणे आहे. ज्यामध्ये मनोज कुमार आणि झीनत अमान दिसले होते. आता उर्फी ने या गाण्याचा रिमेक बनवला आहे. या गाण्याला श्रुती राणीचा आवाज असून या गाण्याचे बोल राजेश मंथन यांनी लिहिले आहे. चाहत्याकडून या गाण्याला खूप पसंती मिळत आहे.

उर्फीचा अतरंगी फॅशन सेन्स

उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेहमी तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण करत असते. उर्फी ने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस असे अनेक लुक बघायला मिळतात. दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून उर्फे तिचे ड्रेस डिझाईन करत असते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चाहते तिला अधिक …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now