लातूर मनपा हद्दवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाची मंजूरी, हरकती मागवण्यासाठी अधिसुचना जारी

latur

लातूर  :  शहर आणि परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी लातूर शहर महापालीका हददवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून ३० दिसाच्या मुदतीत हरकती मागविण्यासाठी आज अधिसुचना जारी करण्यात आली आहे. लातूर शहराजनीक असलेल्या शहरातील लोकांच्या मालकीच्या जमिनी त्याच बरोबर खांडगाव, बसवंतपूर, आर्वी आणि वासनगाव शिवारात नव्यानेवस्ती होऊन शहराचा मोठा विस्तार झालेला आहे. परंतु हा नवीन वस्त्यांचा भाग आणि सबंधित गावच्या ग्रामपंचायतींनाही त्या भागात रस्ते, पाणी, वीज यासह आरोग्याच्या सुविधा पुरविणे शक्य होत नाही. परिणमी मागच्या अनेक वर्षापासून या नवीनवस्ती मध्ये मुलभूत सुविधामध्ये नागरिकांना अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महानगरपालीकेच्या सद्याच्या हददी बाहेर अनेक रहिवाशी कॉलनी विकसीत झाल्या आहेत. व्याारी प्रतिष्ठाणेही स्थापन झालेली आहेत. यातील काही कॉलनीमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून महापालीकेने काही सुविधा पुरविल्या असल्या तरी महापालीकेस तेथून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या परिसरात होणाऱ्या बांधकामावर किंवा वाणिज्य वापरावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. परिणाती नियमबाहय आणि अनधिकृत बांधकामे वाडलेली आहेत. यातून भविष्यात रस्ते, नाली या प्रकारच्या विकासाठी अनेक समस्या निर्माण होणार आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करून पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, महापालीका प्रशासन तसेच महापौर व इतर पदाधिकारी यांनी या सर्वांनी महापालीका हददवाढीचा अभ्यासपूर्ण प्रस्तावना नबरविकास विभगाकडे पाठविला होता. या प्रस्तावासाठी देशमुख यांनी सातत्यांने पाठपूरावा सुरू ठेवल्यामुळे नगसविकास विभागाने तो मंजूर केला असून १३ ऑक्टोबर रोजी या संदर्भाने अधिसुचना ३० दिवसाच्या आत हरकती दाखल करण्याची अधिसुचना दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या