टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असला तर तुम्ही ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) ने काही दिवसांपूर्वी विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये अनेक रिक्त पदांचा समावेश होता. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आज उमेदवारांना शेवटची संधी आहे. UPSC अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये 52 रिक्त पदांसाठी पात्रधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
UPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या 52 जागा
काही दिवसापूर्वी UPSC ने काही रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये विविध 52 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. अधिसुचनेनुसार, या पदांमध्ये प्रॉसिक्यूटर पदांसाठी 12, स्पेशलिस्ट कॅडर पदांसाठी 28, वेटनरी ऑफिसर पदांसाठी 10 आणि असिस्टेंट प्रोफेसर 2 रिक्त पदांचा समावेश आहे.
पात्रता
प्रॉसिक्यूटर – प्रॉसिक्यूटर या पदासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराचे वय तीस वर्षापेक्षा जास्त नसून उमेदवाराला एक वर्षाचा अनुभव असावा.
स्पेशलिस्ट कॅडर : या पदासाठी इच्छुक उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. आणि त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराला तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
असिस्टंट प्रोफेसर
असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे आयुर्वेदिक मेडिसिन ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असावा. या पदासाठी इच्छुक उमेदवार वय 50 वर्षाच्या आत असावे.
अर्ज फी
वरील सर्व पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन फी भरावी लागेल. अर्जदाराला 25 रुपये मात्र फी यासाठी भरावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Explained | ऋजुता लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव?
- Shambhuraj Desai | ‘निवडणूक आयोगाने झुकतं माप दिलं’, ठाकरे गटाच्या आरोपावर शंभूराज देसाई म्हणाले…
- Naresh Mhaske | “आधी मशालीचा उदो-उदो आणि आत्ता…”; ठाकरे गटाच्या पत्रावरुन नरेश म्हस्केंचा ठाकरे गटावर हल्ला
- Uddhav Thackeray | “तुम्ही शिंदे गटाला मदत केली”, १२ मुद्द्यांचं पत्र लिहित ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
- Yogesh Kedar | “चंद्रकांत पाटलांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार संतापले