UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर

upsc

दिल्ली : कोरोना महामारीने पुन्हा एकदा देशभरात थैमान घातलं आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येत असून आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

UPSC 2021 ची पूर्वपरीक्षा (प्रिलिमनिरी) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

देशभरात या परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. मात्र ऐन परीक्षांच्या काळातच करोनाने भारतात धुमाकूळ घातला. त्यामुळे पूर्वपरीक्षांबाबत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता आयोगाने ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महिनाभर आधीच जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP