आई- वडिलांच्या कष्टाचे पोराने पांग फेडले; यूपीएससीत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला

उस्मानाबाद: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससीचा ) निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी या छोट्याशा गावातील गिरीश बदोले हा राज्यात अव्वल आला आहे. गिरीशच्या कुटुंबाचा केवळ दोन एकर शेतीवर चरितार्थ चालतो, त्यामुळे पोराने आई- वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

मागील वर्षी देखील उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वांजली गायकवाड हिने देशात अव्वल क्रमांक मिळवला होता. हीच परंपरा गिरीशने राखली आहे. तो यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 20 वा आला आहे. देशात पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी ठरलाय.

Shivjal