आणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये घटकपक्षामध्ये रणकंदन सुरु झालं आहे. आरएलएसपी आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन अजूनही मतभेद असल्याचं सत्य समोर आलं आहे .

आज पटनामध्ये उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएसपीची बैठक होत आहे. या बैठकीत कुशवाह मोठा निर्णय जाहीर करु शकतात. उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, नितीश कुमार यांच्याकडून अपमान केला गेल्यानंतर याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.

Rohan Deshmukh

याआधी कुशवाहा दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांनी अमित शाहा यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं होतं. पण अमित शाहा यांना त्यांना भेटीची वेळच नाही दिली अशी माहिती दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार उपेंद्र कुशवाहा यांना लोकसभेच्या 3 जागा हव्या आहेत. पण भाजप त्यांना 2 जागा देण्याचा विचार करत आहे. यामुळे कुशवाहा नाराज आहेत. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल अपशब्द वापरल्याचा मुद्दा उचलत त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे कुशवाहा आता एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा करतात का याबाबत बिहारमध्ये चर्चा होत आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...