संजय मामा म्हणतात ‘हा तर राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्याचा डाव

कुर्डूवाडी बाजार समितीमध्ये गैरव्यवहार

टीम महाराष्ट्र देशा – माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संजय शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांना प्रातिक्रिया देताना राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार आसल्याच स्पष्ट केलं आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गैरव्यवहार झाल्याचे भाजपचे माढा तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी उघड केले असल्यामुळे करमाळा बाजार समिती निवडणूकीत जि प अध्यक्ष संजय शिंदे चांगलेच अडचणीत आलेले आहेत.

करमाळा विधानसभेत आमदार होण्याची आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ताबा घेण्याची स्वप्न संजय शिंदे पाहत आहेत. मात्र त्यांच्या स्वप्नांना या आरोपांमूळे सुरुंग लागू शकतो. कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विना परवाना बांधलेल्या गाळ्यांचे लाखो रूपयांना विक्री करून गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार कोकाटे यांनी केली होती. याशिवाय अनेक प्रकारे या संस्थेत भ्रष्टचार झाल्याचे कोकाटे यांनी म्हटले होते. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे अप्पर लेखापरिक्षक वर्ग १ चे व्ही. एन पाखले यांनी दिला आहे त्यामुळे या गैरव्यवहाराची आता चौकशी होणार आहे.

संजय शिंदे यांची सारवासारव

तक्रारदारवर वेश्या व्यवसायचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचे सुद्धा गाळे या ठिकाणी असून प्रत्यक्षात वेगळा व्यवसाय केला जातो. तसेच ऑडिटरने तपासणी करताना संचालक मंडळास विश्वासात घेतले नाही व कसलीही चर्चा केली नाही. राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार आसल्याच स्पष्ट केलं आहे.