मनसेच्या खळखट्याक इशाऱ्याचा दणका ; बँक, रेल्वेला मराठीची सक्ती

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना  मराठी भाषेविषयी आग्रही आहे. एल्फिन्स्टन दुर्घटने  नंतर मनसे परप्रांतीय व मराठी भाषा याविषयी अधिकच आक्रमक झाली. दुकानाच्या पाट्या देखील मराठीच असाव्यात याकरता मनसेने आंदोलन देखील सुरु केले.

राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन आंदोलनाचे समर्थन करून यापुढे मराठीचा वापर न करणाºया बँकाविरोधात खळखट्याकचा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. त्यानंतरही काही बँकांनी त्याला न जुमानल्याने ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आता महाराष्ट्र शासनाने मंगळवारी तातडीने मराठीचा वापर करण्याची सक्ती करण्याचे हे आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र शासनाने मात्र केवळ बँकाच नव्हे तर टपाल कार्यालये, विमान कंपन्या, विमा कंपन्या, गॅस व पेट्रोलिय कंपन्या, करविभाग, दूरध्वनी कंपन्यासह रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे कंपन्यांनाही त्यांच्या दैंनदिन व्यवहारासह पत्रव्यहार आणि जनसंपर्क, जाहिराती, तिकिटांवर हिंदी इंग्रजीबरोबरचमराठी भाषा वापराची सक्ती केली आहे. यासाठी शासनाच्या मराठी भाषा विभागाने केंद्र सरकारचे त्रिभाषा सूत्र आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४, सुधारणा २०१५ची आठवण मंगळवारी काढलेल्या आदेशात करून दिली आहे.

You might also like
Comments
Loading...