मुंबई : अनाथांची माय नावानेच सर्वपरिचित असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी, ४ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. सोशल मीडिया पोस्टद्वारे सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं असल्याचं सांगून भावूक पोस्ट शेअर केले आहे.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ (‘Me Sindhutai Sapkaa’) हा चित्रपट २०१० मध्ये आला होता. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सिंधुताई यांची दमदार भूमिका साकारली होती. आता त्यांच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सर्वांनी सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहिली मात्र तेजस्विनीने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट केली नव्हती त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र तेजस्विनीने टीकाकारांना उत्तर देत माईंच्या आठवणींना उजाळा दिला.
सोशल मीडिया पोस्टद्वारे तेजस्विनीने लिहलं आहे की, “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला… कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणाऱ्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !
“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अ,असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे दरम्यान, सिंधुताईंची प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) ठोसरपागा येथे महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- बाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे
- “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर