‘घोटाळेबाजाना भगव्या झेंड्याला हाथ लावण्याच्या अधिकार नाही’

टीम महाराष्ट्र देशा:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता इथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली.त्यानंतर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की, ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी केला.

त्याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली.तावडे म्हणाले, अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसं नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमचे पक्षाचे मंडळी सोडून चालली आहेत, मग झेंडा झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवलं आहे ते अंमलात आणणार आहोत का? रयतेला न लुटता रयतेला घडवणं हे महाराजांनी केलं. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केलं हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत”.

Loading...

दरम्यान भगवा झेंडा हा हिंदुत्वा मुद्दाच नाही. भगवा झेंडा हा आपल्या परंपरेचं प्रतिक आहे. मंदिरात भगवा झेंडा असतो. वारीला जातो त्या वारकऱ्याकडे भगवा झेंडा असतो. भगवा झेंडा हा मुळात त्यागाचं प्रतिक आहे. आपले सगळे गुरु, महाराज हे सगळे भगवे असतात, कारण ते त्यागाचं प्रतिक आहे. त्यागाचे प्रतिक घेऊन जे राज्य करतात ते त्याग करतात. त्यामुळे स्वार्थ करणारे ज्यांच्यावर राज्य सरकारी बँकेतील घोटाळ्यामुळे गुन्हे दाखल करा म्हटले आहे, त्यांना भगव्या झेंड्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघात तावडेंनी अजित पवारांवर केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण