जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या – शिवेंद्रराजे भोसले

blank

टीम महाराष्ट्र देशा -आम्ही मुलगी दिली त्यामुळे जावई मोठे झालेत असं रामराजे म्हणाले होते. त्यावर जावयी अडचणीत आला तर मुलीला देखील त्रास होणार आहे, असा टोला साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला आहे.

जावळीच्या विकासकामांमध्ये कधीच राजकारण येणार नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यात कधीही राजकारण आणणार नाहीत, असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. जावळीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्ह्यात अलिकडच्या काळात खुनशी राजकारण वाढू लागलं आहे. राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष नाही. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार भल्याभल्यांना समजणार नाहीत. असं रामराजे यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, माझ्याकडे पालकमंत्रिपद आहे त्यामुळे पालक म्हणून जिल्ह्यात डावं, उजवं करणार नाही. त्यामुळे बाबाराजे आपण काळजी करू नका. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली आहे.