‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ सांगलीतील रस्त्याला देण्यात येणार पंतप्रधानाचे नाव

narendr modi

टीम महाराष्ट्र देशा- सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच सांगली-कोल्हापूर रस्त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांची नावे रस्त्याला देण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेला 1 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Loading...

. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका क्षेत्रातील रस्त्याबाबत चर्चा झाली. सांगली-पेठ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यावरही भर देण्यात आला. त्यासाठी एक जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सांगली-पेठ, सांगली- कोल्हापूर या शहराला जोडणा-या प्रमुख मार्गासह महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे हाती घेतली नाही तर नववर्षाच्या प्रारंभीच राजकीय नेत्यांची नावे या रस्त्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून महापौरांपर्यंत सा-यांचीच नावे रस्त्याला देऊन निषेध व्यक्त केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...