‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

१ डिसेंबरला पद्मावती प्रेक्षकांच्या भेटीला.

भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे दुष्य आहेत पद्मावती या बहुचर्चित चित्रपटातील. पद्मावती मधील दीपिकाचे राणी पद्मावतीच्या लुक मधले पहिले पोस्टर रिलीज झाले.दीपिकाचा पोस्टर मधला लुक प्रचंड भाव खाऊन गेला. त्या नंतर शाहीद कपूर व रणवीर सिंगच्या लुकची भलतीच चर्चा झाली होती त्यामुळे पद्मावतीच्या ट्रेलरची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती. आज ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

bagdure

‘गोलियों की रामलीला: रासलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. या दोघांचीही जोडी प्रेक्षकांना इतकी भावली होती की, यानंतर दीपिकासोबत प्रेक्षकांना केवळ रणवीरच हवा होता. अखेर ‘पद्मावती’च्या निमित्ताने प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होतेय. प्रेक्षक रणवीर व दीपिका या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास आतूर आहेत. अर्थात ‘पद्मावती’ तुम्हाला धक्का देणारा आहे. कारण यावेळी रणवीर व दीपिका या चित्रपटात असले तरी दीपिकाची जोडी शाहिद कपूरसोबत दिसतेय. शाहिद कपूर प्रथमच कुण्या पीरियड ड्रामात दिसणार असल्याचे शाहिदचे चाहते उत्सूक आहेत. ट्रेलरमध्ये शाहिदला पाहिल्यानंतर चाहत्यांची ही उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे. रणवीरचे निगेटीव्ह रूप पाहणेही इंटरेस्टिंग आहे. राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला आणि राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोण हिला पाहणे एक अप्रतिम अनुभव आहे. ट्रेलर पाहता, दीपिकाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...