fbpx

आर्ची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ….

मराठीत सांगितलेले कळत नाही का ? इंग्रजीत सांगू या डायलॉगने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर असलेलं नाव.मराठीच नाही तर इतर भाषांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.त्यामुळे सैराटला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या झिंगाट यशानंतर आर्चीचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता होती.

रिंकुच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज आहे. कारण,रिंकु राजगुरू लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहे.सध्या सिनेमाचे वाचन सुरू आहे. या सिनेमाची इतर माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय .

नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोमध्ये जाडजूड असलेल्या रिंकूने वजन कमी केल्याचेही जाणवत आहे. रिंकूने सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही काम केले होते. या चित्रपटात आर्ची चांगलीच जाडजूड दिसत होती. पण आता रिंकूने तिचे वजन कमी केले आहे. कदाचित नव्या चित्रपटांसाठी अगोदरच तयारी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सैराट सिनेमात आर्ची आणि परशा यांची रोमँटीक लव्हस्टोरी सा-यांनाच भावली.त्यामुळे आता रिंकुच्या आगमी मराठी सिनेमात तिच्यासह कोण झळकणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.