fbpx

‘मलाही बायकोचं ऐकावं लागतं’ रघुराम राजन यांनी दिली प्रांजल कबुली

raghuram-rajan

टीम महाराष्ट्र देशा – भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अनेक चर्चेला उधाण आले होते. आम आदमी पक्षाकडून राजन यांना राज्यसभेची ऑफर देखील देण्यात आली होती. पण रघुराम राजन यांनी ती ऑफर नाकारली.  टाइम्स लिट फेस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राजकारण प्रवेशाच्या प्रश्नावर माझं स्पष्ट उत्तर ‘नाही’ असंच आहे. कारण, राजकारण प्रवेशाला माझ्या बायकोचा ठाम विरोध आहे,’ असं सांगत, ‘मलाही बायकोचं ऐकावं लागतं, अशी कबुलीच जणू रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी दिली.

टाइम्स लिट फेस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आम आदमी पक्षानं राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती का, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ‘राजकारणात प्रवेश करण्याची माझी इच्छा नाही. प्राध्यापक म्हणून मी आनंदी आहे. हे काम मला आवडतं. शिवाय, दिवसातील अनेक तास मी वेगवेगळ्या कामात व्यग्र असतो,’ असं त्यांनी सांगितलं. नव्या पुस्तकावर काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.