मी मार्केट कमिटीत भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात फासावर जायला तयार – जगताप

करमाळा – मार्केट कमिटीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमच्यावर विरोधक करत आहेत मात्र एक रुपयाचा जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर मी भर चौकात फासावर जायला तयार आहे मात्र विरोधकांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सिद्ध झाले तर त्यांना मी फासावर जायला नव्हे तर नांदायला जायला सांगेन असा चिंता काढत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने केम येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

माझ्या बापाचा पूतळा मी स्वतःच्या पैशाने बांधला , रश्मी सारखा लोकांच्या वर्गण्या गोळा करून बांधला नाही . मी माझ्या बापाच्या पूतळ्याचे अनावरण करण्यासाठी सक्षम आहे. बहिण -भावानी ‘बापाचं स्वप्न ‘ म्हणून जोगवा मागणं बंद करावं अशी मार्मिक टीका माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बागल गटावर केली .

जयवंतराव जगताप यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

– करमाळा तालुक्याच्या विकासाची दुरदृष्टी ठेवून देशभक्त नामदेवराव जगताप यांनी भीमा नदी अडवुन विकासाची गंगा १९७२ला दौंड जवळ होणारे ‘ उजनी ‘ धरण स्वतःची राजकीय ताकद वापरून आणली यामूळेच या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याचा कायापालट झाला अन् आजचे नंदनवन फुललेले दिसतेय.

– देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच १९४८ साली शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल व्हावे. त्यांच्या रक्ताचं चिज व्हावं या साठी बाजार समितीची स्थापना केली.

– सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

– २००४ साली आदिनाथचा चेअरमन असताना जिल्हयात सर्वाधिक १२०१ रु. भाव दिला.डीसीसी बँकेचा पारदर्शक कारभार केला आहे अन् करत आहे.

– अन्याय झाला तर निश्चीत सांगा पण चूक करुन काम सांगू नका, योग्य विधायक कामं सांगा.

– आमच्या घराण्यात ७ वेळा आमदारकी असताना जनतेचा रुपया खाल्ला नाही , स्वतःची संपत्ती वाढवली नाही ,नाहीतर त्यांचा तळतळाट लागला असता .