fbpx

आणि युवराज सोबत अमिताभ देखील गहिवरले

टीम महाराष्ट्र देशा –  अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या 9व्या सीझनचा शेवट आज होत आहे. 2 महिने चाललेल्या या शोचा शेवटचा एपिसोड दोन दिवस चालणार आहे. या एपिसोडमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री विद्या बालन 6 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये होत्या. युवराजने या एपिसोडमध्ये त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी अमिताभ बच्चन यांना सांगितल्या. यात युवराज फारच इमोशनल झाल्याचे दिसते आहे. युवराज बोलताना रडायलाही लागला. त्याला रडताना पाहून अमिताभ बच्चन यांचेही डोळे पाणावले. युवराजच्या कॅन्सर या आजाराबद्दल बोलत होता. 2011 च्या वर्ल्डकपदरम्यान त्याची तब्येत खूप जास्त बिघडली होती. तेव्हा त्याला डॉक्टरने तू वेळेत उपचार केले नाहीस तर वाचू शकणार नाही, असे तो म्हणाला. त्याने सांगितले की, त्याच्या शरीरातून 14 सेंटीमीटरचा ट्यूमर काढण्यात आला होता.

2 Comments

Click here to post a comment