स्लो इंटरनेट असेल तरी लुटता येणार व्हिडिओचा आनंद

 यूट्यूबने आपल्या ग्राहकांसाठी आणले नवीन अॅप

टीम महाराष्ट्र देशा – यूट्यूबने काही महिन्यांपूर्वीच ‘यूट्यूब गो’ या अॅपचे बीटा व्हर्जन जारी केले होते. मात्र, आता हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटरनेट नसेल किंवा वेग कमी असला तरी या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ पाहता येणार आहेत. हे अॅप २०१६मध्ये आयोजित केलेल्या ‘मेड फॉर इंडिया’ कार्यक्रमात लाँच करण्यात आले होते.

या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी कमी डेटा खर्च होतो. व्हिडिओ ऑफलाइन पाहण्यापूर्वी त्याचं पूर्वावलोकनही करता येणार आहे. तसेच डाउनलोड केलेले व्हिडिओ इंटरनल मेमरी किंवा एसडी कार्डमध्येही सेव्ह करता येतील. तसेच ब्लूटूथनेद्वारे शेअरही करणे शक्य होणार आहे. वाय-फाय तंत्रज्ञानाद्वारेही ते शेअर करता येतील. या अॅपची साइज १० एमबीपेक्षा कमी असून ते अँड्रॉइडवर ४.२ किटकॅट किंवा त्याहून अधिक असलेल्या व्हर्जनवर सुरू होते.

You might also like
Comments
Loading...