कामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते – सनी लिऑन

टीम महाराष्ट्र देशा – एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेल्या सनीने लैंगिक अत्याचाबाबत प्रतिक्रिया दिल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे की, सनी नेमकी काय बोलली? ‘टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ला सनीने नुकतीच एक मुलाखत दिली.

या मुलाखतीत सनीने लैंगिकत अत्याचाराबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबाबत आणि या शोषणाला बळी पडलेल्या पीडितांबद्दल सहनुभूती व्यक्त केली आहे. सनी म्हणते, ‘कामाच्या ठिकाणी केवळ महिलांचेच लैंगिक शेषण होते असे नाही. तर, अनेकदा पुरूषांचेही लैंगिक शोषण होते. अनेक ठिकाणी ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, हे अत्याचार कोणीही खपवून घेऊ नयेत. आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल प्रत्येकाने दाद मागायला हवी. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत गोष्टी कधीच बदलणार नाहीत.’