……… आणि शाहरुख पडला ममताच्या पाया

टीम महाराष्ट्र देशा – बहिण-भावाच्या प्रेमाचीच एक झलक सर्वांना कोलकातामध्ये पहायला मिळाली. विमानतळावर स्वत: ममता बॅनर्जी आपल्या सॅन्ट्रो कारमधून शाहरूख खानला सोडण्यासाठी आल्या. त्यानंतर शाहरुख खानने त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला.

काही काळ कार्यक्रमात थांबल्यानंतर विमानतळावर जाताना स्वत: ममता बॅनर्जी यांनी अभिनेता शाहरुख खान याला विमानतळावर ड्रॉप केलं. यावेळी शाहरुख खानने गाडीतून उतरल्यावर ममता बॅनर्जी यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतलापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अभिनेता शाहरुख खान आपली मोठी बहिण मानतो.

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.या कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री काजोल यासारख्या सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर, शाहरुख खान मुख्य अतिथी होता

You might also like
Comments
Loading...