अबब…! काँग्रेस कार्यालयात राष्ट्रगीताऐवजी वाजली संघ प्रार्थना ?

National Congress

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस हे नेहमीच आमने सामने असतात. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून यांची ओळख आहे. काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात यावर्षी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना राष्ट्रगीताऐवजी ध्वनिवर्धकवरून नमस्ते सदा वत्सले मातृभूमे… ही रा.स्व.संघाची प्रार्थनाच वाजविण्यात आल्याचा प्रकार घडला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संघ प्रार्थनेच्या तालावरील ध्वजवंदन केले. रा.स्व.संघावर नेहमी टीकास्त्र सोडणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रगीताऐवजी संघ प्रार्थना वाजवत ध्वजवंदन केल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. जळगाव तरुणभारत ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

या वृतानुसार २६ जानेवारीला सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजारोहण करत असतांना सर्व कार्यकर्ते सावधान स्थितीत उभे होते. राष्ट्रगीत कानावर येईल म्हणून सगळे वाट पाहत होते. पण झाल भलतच राष्ट्रगीता ऐवजी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कानावर ते शब्द पडले. ते रा.स्व.संघाची प्रार्थना नमस्ते सदा वत्सले मातृभूमे… त्यामुळे अशोकराव टिळक भवनात राजकीय चर्चेला उधान आले होते. ध्वनिवर्धकवरून चक्क रा.स्व.संघाची प्रार्थना नमस्ते सदा वत्सले मातृभूमे… वाजत होती. काही काळ सर्वजन स्तब्ध होते. कोणाला काही सुचत नव्हते. कार्यकर्त्यांनी धावपळ करून ध्वनिक्षेपक बंद करून राष्ट्रगीताचा सीडी शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली.

सचिन सावंत यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.