व्हॉट्सअॅपच या फिचरमुळे बँकिंग होणार आणखी सोप्प

व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन धमाकेदार फिचर घेऊन येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये पेमेंट ऑप्शन जोडण्याची तयारी करत आहे.

डिसेंबर महिन्यापर्यंत हे फिचर लॉन्च होऊ शकतं. हे फिचर सुरू झाल्यावर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर करू शकता.

Loading...

व्हॉट्स अॅपच्या या नव्या फिचर बाबतीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. आता एका नव्या रिपोर्टनुसार याबाबत माहिती मिळाली आहे. फॅक्टर डेलीच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप पेमेंट फिचरवर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे आणि आता हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. कंपनीने या अॅपमधून पेमेंट ऑप्शन देण्याची तयारी केली आहे. डिसेंबर महिन्यात हे फिचर सुरू होणार असल्याची चर्चा होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्स अॅपच्या या फिचरची नोव्हेंबरमध्ये बिटा टेस्टींग होणार आहे. त्यानंतरच डिसेंबरमध्ये हे फिचर यूजर्ससाठी मिळेल. पेमेंट फिचरसाठी व्हॉट्सअॅप फायनॅन्शिअल संस्थांसोबत बोलणी करत आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर भारतातील अनेक डिजिटल वॉलेट कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप या फिचरसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बॅंकेसोबत बोलणी करत आहे. आतापर्यंत बॅंकेकडून याबाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का