चीन पाठोपाठ आणखी एका देशात व्हॉट्सअॅपवर बंदी

टीम महाराष्ट्र देशा – कालच अनेक देशात व्हॉट्सअॅप डाऊन झाले. आता मात्र चीननंतर अफगाणिस्तनात व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. सर्वप्रथम चीनने व्हॉट्सअॅपवर बंदी आणली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान टेलीकॉम रेगुलेटरीने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामला पत्र लिहून दोघांना देखील आपली सेवा ताबडतोब बंद करण्यास सांगितले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र अजूनही व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामने अफगाणिस्तानात आपली सर्व्हिस बंद केली की नाही, हे निश्चित झाले नाही.

अफगानिस्तान संचार आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने पत्र लिहून या दोन्ही कंपन्यांना आपली सेवा बंद करण्यास सांगितले होते. मात्र त्याचबरोबर अफगाणिस्तानात दोन्ही अॅप वरील हे बंधन फक्त २० दिवस राहील, असे देखील वृत्त आहे. या सगळ्यात अफगानिस्तान ची खुफिया एजेंसी आणि राष्ट्रीय सुरक्षा निदेशालय यांचा देखील हात आहे.

एका मुलाखतीत अफगानिस्तानच्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की,सुरक्षेसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.; तर संचार आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने याचे कारण व्हॉट्सअॅपची वाईट सर्व्हिस असल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तान सरकार व्हॉट्सअॅपला नवीन पर्याय शोधण्याच्या विचारात आहे.

You might also like
Comments
Loading...