लोकप्रतिनिधींना पुणेकरांविषयी काहीच देणंघेणं नाही

BJP-580x395

टीम महाराष्ट्र देशा – : पुणेकरांच्या पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिकेत वाद सुरू असतानाच पुणे शहराचा पाणीसाठा निश्‍चित करण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बोलविलेल्या बैठकीस शहरातील भाजपचे 8 आमदार आणि 2 खासदारांनी दांडी मारली.

त्यामुळे पुणेकरांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपला भरभरून मताची बेगमी दिली असली तरी या सर्व लोकप्रतिनिधींना पुणेकरांविषयी काहीच देणंघेणं नसल्याचे या निमिताने पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान, या बैठकीत पुणेकरांना दिलासा मिळाला असून फेब्रुवारी 2018 पर्यंत पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात ना करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच खडकवासला धरणातून 10 डिसेंबर पासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महापालिका जास्त पाणी वापरात असल्याचा आरोपही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आले.मात्र, पालिकेकडून ते सर्व नाकारण्यात आले. या बैठकीत पाटबंधारे विभागाने मागणी केलेल्या 354 कोटीच्या थकबाकीवर कोणताही निर्णय झालेला नाही