विराट कमाईत देखील विराटच ;फोर्ब्सच्या पहिल्या 10 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत स्थान

कमाईच्या बाबतीत विराटनं फुटबॉलपटू मेस्सीलाही मागे टाकलंय

विराट आणि नव-नवीन विक्रम हे जणू समीकरण झाले आहे . आता विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झालाय. आणि हा विक्रम आहे कमाईचा. जगातल्या १० श्रीमंत खेळाडूंची यादी फोर्ब्सनं जारी केलीये. या यादीमध्ये एकमेव क्रिकेटर आहे. आणि तो क्रिकेटर आहे विराट कोहली.

कमाईच्या बाबतीत विराटनं फुटबॉलपट्टू मेस्सीलाही मागे टाकलंय. विराटचं वार्षिक उत्पन्न आहे ९० कोटींपेक्षा जास्त. आणि कमाईच्या बाबतीत विराटचा क्रमांक लागतो ७ वा. तर टेनिसपटू रॉजर फेडरर कमाईमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. फेडररची वार्षिक कमाई ३७.२ मीलियन डॉलर आहे.

जगातले 10 श्रीमंत खेळाडू
1. राॅजर फेडरर $37.2 मिलेनियम
2. लेब्रोन जेम्स $33.4 मिलेनियम
3. हुसेन बोल्ट $27 मिलेनियम
4. क्रिस्टियानो रोनाल्डो $21.5 मिलेनियम
5. फिल मिकेलसन $19.6 मिलेनियम
6. टाइगर वुड्स $16.6 मिलेनियम
7. विराट कोहली $14.5 मिलेनियम
8. रॉरी मॅक्लरॉय $13.6 मिलेनियम
9. लियोनल मेसी $13.5 मिलेनियम
10. स्टेफ करी $13.4 मिलेनियम

You might also like
Comments
Loading...