नारायण राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का’ – विनायक राऊत

Narayan-Rane.

टीम महाराष्ट्र देशा –  नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यापासून चहु बाजूनी राणेंवर ठिका होत आहे. शिवसेनेने तर नारायण राणेंना निशाण्यावर धरले आहे.लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे आणि नारायण राणेंना देखील मंत्री मंडळात सामावून घेण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे ईडीच्या चौकशीतून वाचता यावं यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

स्वार्थासाठी राणेंनी काँग्रेस सोडली, आता त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाल्याचंही राऊतानी म्हटलंय. ते आज रत्नागिरीत बोलत होते.नारायण राणेंना भाजपा मंत्रिमंडळात घेणार नाही असा विश्वासही विनायक राऊतांनी व्यक्त केला. तळ कोकणात राणे आणि राऊत एकमेकांचे राजकीय वैरी आहेत.

राणेंनी काँग्रेस सोडून भाजपची साथ धरल्यापासून शिवसेनेनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याचा पुढचा भाग आज रत्नागिरीत बघयाला मिळाला.