तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी

tuzyat jiv rangla

टीम महाराष्ट्र देशा: तरुणाईच्या पसंतीला आलेली ‘झी मराठी’ वरील मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत  आहे, या मालिकेमुळे कोल्हापुरात तर चक्क वादंग उठल आहे,मालिकेचे  शुटींग कोल्हापुरातल्या ज्या गावात चालू आहे त्या गावातल्या गावकर्यांनी या मालिकेचे  शुटींग थांबवण्याची मागणी केली आहे, त्याबद्दलच निवेदन गावकर्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.

कोल्हापुरातल्या वसगडे या गावात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचं शुटींग केलं जातं. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर गावातल्या ज्या वाड्यामध्ये शुटींग चालू आहे त्या वाड्याच्या मालकाकडूनही शिवीगाळ व दमदाटी होत असल्यचा आरोप आता गावकर्यांनी केला आहे.