लव्ह जिहादच्या घटना थांबवल्या नाही तर बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम मुलींना पटवतील

bajarang dal

टीम महाराष्ट्र देशा -केरळमधील हदीया या हिंदु मुलीच्या लव्ह जिहादच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना विश्व हिंदु परिषदेच्या नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. ‘मुस्लिमांनी लव्ह जिहादच्या घटना थांबवल्या नाही तर बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम मुलींना पटवतील,’ असे विधान गोपाल यांनी केले आहे. कर्नाटकात उडुपी येथे विश्व हिंदु परिषदेतर्फे आयोजित धर्मसंसदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.गोपाल यांनी हे वक्तव्य केले तेव्हा मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते.

मुस्लिम तरुण हिंदुंची संख्या कमी व्हावी आणि मुस्लिमांची संख्या वाढावी यासाठी लव्ह जिहाद करुन हिंदु मुलींशी निकाह करत आहेत. या लव्ह जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्यांनी आता मुस्लीम मुलींशी लग्न करावे असा सल्ला विश्व हिंदु परिषदेचे नेते गोपाल यांनी दिला आहे.