राज यांच्या हिंसक आंदोलनांमुळे आम्ही अस्वस्थ होतो; त्या सहा नगरसेवकांनी केला खुलासा

टीम महाराष्ट्र देशा – मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणाऱ्या सहा नगरसेवकांनी खळबळजनक दावे केलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला पक्षाच्या कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेतले जात नव्हते, अशा शब्दात या नगरसेवकांनी मनसे नेतृत्वावर आगपाखड केलीय.

पक्षांतर करणाऱ्या ६ नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडं याचिका दाखल केली. त्या याचिकेवर दिलेल्या लेखी उत्तरात नगरसेवकांनी हा दावा केलाय.

आम्ही मनसेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलो, पण पक्षातील पदांबाबत तसेच वेळोवेळी होणाऱ्या निर्णयांबाबत आमच्यात अस्वस्थता होती, असेही त्यांनी प्रथमच बोलताना सांगितले..

मराठी माणूस मुंबईच्या महापौरपदी राहणे आवश्यक आहे, असे सांगत दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र लेखी उत्तरात त्यांनी त्याबाबत काहीच म्हटलेले नाही.

You might also like
Comments
Loading...