fbpx

त्या नवजात बालकाच्या कुटुंबाला ओलाकडून खास गिफ्ट 

updatedpune-woman-delivers-baby-in-ola-cab-company-give-free-rides-for-5-years-

एकाद्या बालकाचा विमान प्रवासात जन्म झाला तर त्या बालकाला  विमान कंपनी एक खास भेट वस्तू देते. तो त्या कंपनीच्या विमानातून एका मर्यादित कालावधी मध्ये मोफत प्रवास करू शकतो. काल पुण्यामध्ये एक अशीच घटना घडली. एका महिलेने ओला या ऑनलाईन कॅब सर्विसेसच्या कॅब मध्ये एका मुलाला जन्म दिला. आणि त्या  नवजात बालकाला ओलाने देखील अनोखी भेट दिली आहे.

नवजात बालकाला व त्यांच्या  कुटुंबाला  पाच वर्ष ओला कॅब द्वारे मोफत प्रवास करता येणार आहे. नवजात बालकाचा जन्म कॅब मध्ये झालेल्याची माहिती  यशवंत गलांडे यांनी  ओला कंपनीला दिली होती.  यावरून ओलाने हा मोफत प्रवासाची ऑफर देऊ केली.यशवंत यांचे देखील ओलाने आपल्या फेसबुक पेजवर आभार मानले आहेत.

काय आहे नेमकी घटना.

विश्वकर्मा यांच्या पत्नी गरोदर होत्या. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अचानक प्रसुतिकळा येऊ लागल्याने, रमेश यांनी तातडीने ओला कॅब मागविली. काही क्षणात कॅब दारात आली. तातडीने रमेश त्यांच्या पत्नीला घेऊन कॅब द्वारे कमला नेहरू हॉस्पिटलकडे रवाना झाले. पण अर्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये विश्वकर्मा यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. आता बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत.