व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी लवकरच दोन नवे फीचर्स 

टीम महाराष्ट्र देशा – व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिल्यानंतर आता कॉलिंगसाठी आणखी एक नवे फीचर देणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच करता येईल. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप सध्या व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच या फीचरवर काम करत असून या फीचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल.

तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वीच फीचरची चाचणी करत असताना रेकॉर्डिंगचाही टॉगल दिसून आला, ज्यामुळे रेकॉर्डिंग लॉक केली जाऊ शकते. लॉक झाल्यामुळे कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

You might also like
Comments
Loading...