हे नवीन नियम पाळा अन्यथा तुमचे देखील ट्विटर अकाऊंट होईल बंद

twitter

टीम महाराष्ट्र देशा – ट्विटरवर ट्रोल झाल्यामुळे अनेकांना मानसिक त्रासाला सामोर जावे लागते. नेतेमंडळी असोवा बॉलीवूडमधील सेलेब्रिटी सर्वांनाच टार्गेट केल जात पण आता लवकरच या सर्व गोष्टीना आळा बसणार आहे.
१८ डिसेंबरपासून ट्विटरवर नव्या नियमांचा समावेश केला जाणार आहे. ट्विटरवर आक्षेपार्ह विधान अथावा ट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्यास अकाऊंट बंद होणार. अनेकदा एखाद्यावर टीका करताना सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने वापरली जातात. ट्विटरच्या हेटफ़ुल कंडक्ट पॉलिसीनुसार, १८ डिसेंबरपासून ट्विटरवर एखाद्याने ट्रोल करण्याचा वा आक्षेपार्ह विधाने वापरण्याचा प्रयत्न केल्यास ट्विटर अकाऊंट बंद केले जाईल. एखाद्या व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट बंद करायचे असल्यास ट्विटर सर्वात आधी युझरला ट्वीट डिलीट करण्याचा इशारा देईल. मात्र त्यानंतरही यूझरने ते ट्विट डिलीट केले नाही तर ट्विटरकडून ते अकाऊंट डिलीट होईल

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...